Labels

Wednesday, October 12, 2011

दिवस हे पाखरासारखे असतात ....


दिवस हे पाखरासारखे असतात !
भुर्रकण उडून जातात !
आणि उरतात फक्त पिसं....आठवणींची
काही काळी ; काही पांढरी; काही रंगीत !
काही मऊ; काही खरबरीत !
खरं तर ही पीसच जपून ठेवायची असतात....
आणि ती गुंफून तयार करायची असते चटई!
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बसायला !...

No comments:

Post a Comment